Home » Activities of Hospital

Activities of Hospital

परशुराम रूग्णालयातील विविध उपक्रम

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या संस्थेने परिसरातील पंधरा गावे दत्तक घेतली असून तेथील नागरिकांसाठी विविध उपक्रम नियमित सुरु आहेत. आरोग्यबाबत जनजागृती, रोग निदान आणि चिकित्सा यांचा यात समावेश आहे. तसेच बालकांपासून जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटांचा यात विचार केला आहे.

 • सुदृढ बालक स्पर्धा —- ० ते ६ वर्ष बालकांसाठी
 • सुवर्णप्राशन संस्कार ( ० ते १२ वर्ष वयोगटातील मुलांसाठी )
 • शालेय विद्यार्थ्यासाठी आरोग्य तपासणी
 • किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन
 • गर्भवती महिलांना मार्गदर्शन
 • विवाहित जोडप्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन
 • चाळीस वर्षाहून अधिक वयाच्या महिलांची आरोग्य तपासणी व वयानुरूप होणाऱ्या आरोग्य समस्यांबाबत मार्गदर्शन
 • मधुमेही रुग्णांची आरोग्य तपासणी व चिकित्सा
 • जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व चिकित्सा

 

 • १५ ऑगस्ट २०१५ पासून प्रत्येक सोमवारी रुग्ण तपासणी मोफत केली जाते.
 • मधुमेही रुग्णांची तपासणी मोफत करून त्यांना योग्य दिनचर्या, आहारविहार व विशेष उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात येते.
 • मणक्यांचे विकार संदर्भात अल्प दरात पंचकर्म चिकित्सेद्व्यारे उपचार करण्यात

येतात.

 • वंध्यत्व रुग्णांसाठी स्वतंत्र तपासणी व गरोदर महिलांना आहार, व्यायाम , योगासने याविषयी मार्गदर्शन.
 • आयुष मंत्रालय मान्यता प्राप्त माता व बाल संगोपन उपक्रम पाच तालुक्यांमध्ये राबविण्यात येतो.